पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा दि.14 व 15 मे रोजीचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग,दि.13 (जिमाका):- राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा शनिवार, दि.14 मे 2022 व रविवार, दि.15 मे 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-

शनिवार, दि.14 मे 2022: सकाळी 08.30 वाजता अलिबाग येथून मोटारीने रेवदंडा, ता.अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 09.00 वाजता रेवदंडा येथे आगमन व पद्मभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट. सकाळी 09.30 वाजता रेवदंडा येथून मोटारीने श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता श्रीवर्धन येथे आगमन व श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन. दांडगुरी येथे रस्ता उद्घाटन, साखरोने येथे रस्ता उद्घाटन, मोहितेवाडी येथे स्मशानशेड उद्घाटन, वाळवटी येथे अंतर्गत रस्ता उद्घाटन. रात्री श्रीवर्धन येथे मुक्काम.

रविवार, दि.15 मे 2022: सकाळी 09.30 वाजता श्रीवर्धन बीच बांधकाम कामाची पाहणी. सकाळी 10.00 वाजता श्रीवर्धन शहर विविध विकास कामे- 1.श्रीवर्धन नगरपरिषद जीवनेश्वर कोंड रस्ता कामाचा शुभारंभ, 2.श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील पेशवे आळी रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ, 3.जीवनेश्वर आळीमधील रस्त्याचे उंचीकरण, डांबरीकरण व दोन्ही बाजूची पिचिंग करणे आणि रस्त्याचे कामाचा शुभारंभ, 4.काळेश्री मंदिरापासून धोडगल्ली येथील श्री.रटाटे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. दुपारी 12.00 वाजता वडघर-पांगळोली मंदीर जीर्णोध्दार कार्यक्रम व रस्ता उद्घाटन. दुपारी 01.30 वाजता मौजे संदेरी, सातीम आळी, ता.म्हसळा येथे श्री साईबाबा पालखी सोहळा व साई भंडाऱ्यास उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता मौजे संदेरी, ता.म्हसळा येथून मोटारीने इस्लामपूर, जि.सांगली कडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज