जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देणार --महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यस्तरीय पोषण माह सांगता सोहळा मंत्री श्रीमती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न पोषण आहार प्रदर्शन, पारितोषिकांचे वितरण, विविध कार्यक्रमांनी उपक्रमाची सांगता
रायगड,दि.06 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देण्याचा प्रयत्न असून यासाठी जिल्ह्यात होणारे काम राज्यासाठी मॉडेल ठरणार आहे. सध्या भाड्याच्या जागेत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या इमारतीत जाता यावे यासाठी बांधकामासाठी सध्या असलेल्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करण्यात येईल ज्यामुळे तेथे असणारा हॉल तसेच पोषण आहारासाठी चे किचन व स्वच्छतागृह यासह अंगणवाडी केंद्र सुसज्ज असेल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त विजय क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त अनंत खंडागळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीम.निर्मला कुचिक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विनी...