वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक
रायगड,(जिमाका)दि.27:- केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार, वाहनांस HSRP बसविण्यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दि.23 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक असून मा.सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशेही दिलेले असून या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उप्तादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट HSRP बसविण्याबाबत अवगत केले आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध्ये विभागणी करण्यात आलेली असून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची झोन-1 मध्ये विभागणी करण्यात आलेली असून M/s. Rosmerta Safety Systems Ltd. या उत्पादकास/संस्थेस वितरक म्हणून प्राधिकृत केले आहे. सदरील हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेटसाठी ऑनलाईन बँ...