शनिवारी लोकअदालतीचे आयोजन
शनिवारी लोकअदालतीचे आयोजन अलिबाग-दि. 06(जिमाका- रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा, तालुका, सहकार व कामगार न्यायालयात शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये रायगड जिल्ह्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे कलम 138 एन.आय.ॲक्ट, विवाह प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी दावे,फौजदारी व दिवाणी अपिले, भूसंपादन प्रकरणे, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयाची एकूण 4441 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच वादपूर्व प्रकरणे, रक्कम वसूलीची प्रकरणे, नगरपालिका व ग्रामपंचायतची पाणी पट्टी व घर पट्टी वादपूर्व प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनीची व राष्ट्रीयकृत बँकाची वादपूर्व प्रकरणे अशी 20434 प्रकरणे सामंजस्याने तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती संदिप स्वामी,न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग यांनी दिली. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभा इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश...