Posts

Showing posts from December 7, 2025

दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

    रायगड-अलिबाग,दि.09(जिमाका):-   अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग   यां च्या  कार्यालयाद्वारे दि. 22 डिसेंबर 2025   रोजी, सकाळी  11.00   वाजता  डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीमध्ये नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्यांचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अ शा  टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.            तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत   अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग   ता.अलिबाग, जि.रायगड   यां च्या कडे दि. 18 डिसेंबर 2025   पर्यंत पोहचेल अशारितीने पाठवावी. ००००००

अतितीव्र दिव्यांग व्यक्तींनी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.08 (जिमाका):-   सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषदेने 5 टक्के जिल्हा परिषदेस दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींसाठी नाविण्यपूर्ण योजना म्हणून "अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे" या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेसाठी लाभार्थी निवडी बाबतचे निकष, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इ. निश्चित करण्यात आल्या आहेत. योजनेसाठी विहित नमुन्यातील फॉर्म तयार करण्यात आलेले असून फॉर्म गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, गाव पातळीवर सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव दि.31 डिसेंबर 2025 पूर्वी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावेत,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे सर्व साधारण निकष असतील :- लाभार्थ्यांकडे दिव्यांगात्याचे प्रमाण 60 टक्के किंवा 60 टक्के पेक्षा जास्त असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक अ...