सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ सोहळा संपन्न

 


 

          रायगड-अलिबाग,दि.11 (जिमाका):- रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन-2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम सोहळा (बुधवार दि.10 डिसेंबर 2025 रोजी) राजस्व सभागृहजिल्हाधिकारी कार्यालयरायगड-अलिबाग येथे  जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण समिती किशन  जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

            या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर जी.एस.हरळय्या तसेच तहसिलदार चंद्रशेखर मोरे उपस्थित होते.

ले.कर्नल माने यांनी जिल्हाधिकारी महोदय तसेच उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना ध्वज लावले व जिल्हाधिकारी महोदयांनी देणगीपेटी मध्ये देणगी देवून सशस्त्र सेना ध्वजदिन-2025 निधी संकलनाचा शुभारंभ झाल्याचे ‍जाहीर केले.

कार्यक्रमात कै.सरला सदाशिव वेलणकर यांचे स्मरणार्थ ध्वजदिन निधी-2025 साठी राजीव सदाशिव वेलणकर रु. 34,000/-,  संतोष प्रभाकर म्हात्रे रु.33,000/- व सौ. राजश्री अनिल जोशी रु. 33,000/- चे धनादेश दिले.

शासनाकडून रायगड जिल्हयाला सशस्त्र सेना ध्वजदिन-2024 करीता रु.68 लाखाचे उद्दीष्ट  देण्यात आले होते व रायगड जिल्हयाने रु. 84 लाख 20 हजार म्हणजेच 124 टक्के  निधी संकलन केले आहे. 

सशस्त्र सेना ध्वजदिन-2024 चे उद्दीष्ट पुर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडून  जिल्हाधिकारी महोदयांकरीता प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राहुल माने यांनी प्रदान केले.

तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन-2024 चे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडून प्राप्त स्मृतिचिन्ह  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड कर्नल राहुल वैजनाथ माने यांना जिल्हाधिकारी किशन जावळे शुभहस्ते प्रदान करण्यात आले. 

सशस्त्र सेना ध्वजदिन- 2024 करीता भरघोष देणगी देणाऱ्या देणगीदारांचे  जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते स्मृतिचिन्हे व प्रशस्तीपत्रे देउन सन्मान करण्यात आला.   विशेष गौरव पुरस्कार इयत्ता 10 वी, 12 वी तसेच तत्सम परिक्षामध्ये विशेष कामगिरी केलेल्या  माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी सैनिक कल्याण विभागाद्वारे विशेष गौरव पुरस्कार दिला जातो.   सन 2024-202या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी मध्ये कु.आदिती विवेक विभूते हिने 94.40 टक्के गुण प्राप्त केल्याने तसेच कु.आयुष तान्हाजी मोरे यास 94.40 टक्के गुण प्राप्त केल्याने विशेष गौरव पुरस्कार अंतर्गत सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट़ राज्य, पुणे यांच्याकडून प्रत्येकी रक्कम रुपये - रु.20,000/- चे धनादेश व प्रशस्तीपत्र जिल्हाधिकारी महोदयांचे यांच्या हस्ते प्रदान करुन  गौरविण्यात येत आहे.

ध्वजदिन-202निधी संकलन करीता शासनाकडून रायगड जिल्ह्यास दिलेले रु. 68 लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी जिल्ह्यातील अनेक कार्यालय व संस्था यांचा मोलाचा वाटा आहे.  अशा कार्यालय व संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रे देउन गौरव करण्यात आला.

 या कार्यक्रमात जिल्हाधिकारी महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  मान्यवारांचे स्वागत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीलॅफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृतयांनी करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करुन अमर जवान ज्योत प्रतिमेला पुष्प अर्पण करुन करण्यात आली.  त्यानंतर शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  शेख अब्दुल मस्जीद यांनी केले. 

कार्यक्रमास वीर पत्नी श्रीमती निशा कांबळे तसेच सर्व कार्यालये/संस्थांचे कार्यालय प्रमुख,अधिकारी /कर्मचारीमाजी सैनिक व विशेष गौरव पुरस्कार लाभार्थी  उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान