उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना
रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका): राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) तसेच हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांच्या सूचनांनुसार नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, पंचायत, शिक्षण, कामगार, परिवहन, कृषी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, महिला व बालविकास, MIDC तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS सुविधा, शीतपेय केंद्रे, प्रथमोपचार किट, तसेच जनजागृती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य व...