जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर दि. 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Choose Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन...