जिल्हा समन्वयक श्री. गजभिये यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दिली ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाबाबतची माहिती

 


      अलिबाग,जि.रायगड,दि.03, (जिमाका):- राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार, आमदार महेंद्र दळवी व  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आज दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेवून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये   यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील एकूण  22 गावांमध्ये चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची, विशेष प्रकल्पांची व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सदय:स्थिती याबाबतची माहिती  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

      यावेळी राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ही ग्रामविकासासाठी एक उत्तम संकल्पना असल्याचे सांगून श्री.गजभिये यांना रायगड जिल्ह्यासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत