जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा - उद्योग मंत्री सुभाष देसाई

जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा - उद्योग मंत्री सुभाष देसाई अलिबाग दि.27 (जिमाका) जेनेरिक औषधांचा वापर हा आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज माणगांव येथे केले. प्रबोधन गोरेगांव ग्राहक संस्था मर्यादित संस्थेच्यावतीने माणगांव येथे सुरु करण्यात आलेल्या रायगड जिल्हयातील जेनेरिक औषध पेढीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते. मंत्री महोदय पुढे बोलताना म्हणाले की, प्रबोधन औषधपेढी ही महाराष्ट...