बॉईज स्पोर्टस कंपनी निवड चाचणी

बॉईज स्पोर्टस कंपनी
 निवड चाचणी
अलिबाग दि.23:-(जिमाका)- मॅकनॉईज रेजीमेन्टल सेंटर, अहमदनगर यांचे मार्फत 12 जून ते 14 जुन 2017 रोजी या आरचेरी(तिरंदाजी), शूटींग (निशानेबाजी खेळासाठी खुली निवड व प्रवेश प्रक्रीयेचे आयोजन केले आहे.याकरिता पात्रता पुढीलप्रमाणे आहे.पात्रता:- वयोमर्यादा 11 ते 14  वर्ष,शैक्षणिक पात्रता- कमीत कमी 5 वी पास, (बरोबर इंग्रजी व हिंदीचे चांगले ज्ञान असावे)मेडिकल फिटनेस- मेडिकल चाचणी मॅकनाईज रेजीमेंटल सेंटर, अहमदनगर यांचेकडून घेतली जाईल.प्रमाणपत्रे-उमेदवाराला आपले सब ज्यूनियर,ज्यूनियर नेशनल, ईटर स्कूल,स्टेट लेव्हल खेळाचे मेडल,पार्टीसीपेशन सर्टीफिकेट जमा करावे लागेल.तसेच विशेष सूचना म्हणजे उमेदवाराच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टेटू (गोंदण )नसावे.
यासाठी खेळाडूची उंची व वजन पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे. खेळ:- आरचेरी(तिरंदाजी) वय मर्यादा-11 ते 14  वर्ष-वय-08 वर्षे उंची:- 134 से.मी.,वजन:-29 कि.ग्रँ ब)शूटींग (निशानेबाजी):- वय मर्यादा-11 ते 14  वर्ष-वय-09 वर्षे उंची:- 139 से.मी.,वजन:-31 कि.ग्रँ. वय-10 वर्षे उंची:- 143 से.मी.,वजन:-34 कि.ग्रँ., वय-11 वर्षे उंची:- 150 से.मी.,वजन:-37 कि.ग्रँ., वय-12 वर्षे उंची:- 153 से.मी.,वजन:-40 कि.ग्रँ., वय-13 वर्षे उंची:- 155 से.मी.,वजन:-42 कि.ग्रँ., वय-14 वर्षे उंची:- 160 से.मी.,वजन:-347 कि.ग्रँ.
सोबत लागणारे कागदपत्र(ओरीजनल व फोटोकॉफी):-1.)जन्म् प्रमाणपत्र(म्युनिसिपल किंवा रजिस्टार यांनी दिलेले),जातीचा दाखला,शाळेचा शिक्षणाचा दाखला, सरपंच यांनी दिलेले चारित्र प्रमाणपत्र,डोमासील सर्टिफीकेट, रहिवासी दाखला फोटोसहीत(तहसिलदार किंवा एसडीएम यांनी दिलेले),6.) 10फोटोग्राफ,7.)खेळाचे जिल्हा व राज्य स्तरीय प्रमाणपत्रे.उपरोक्त खेळासाठी संबंधितांनी 12 जून 2017 ,वेळ-सकाळी 9.00वाजले पासून पुढे फुटबॉल ग्राउंड,मॅकनाईज रेजीमेन्टल सेंटर,अहमदनगर येथे रिपोर्ट करावा.
अधिक माहितीकरीता संपर्कासाठी पत्ता- बॉईज स्पोर्टस कंपनी,मॅकनाईज रेजीमेन्टल सेंटर, अहमदनगर-ई-मेल-bsemirc2005@gmail.com, दूरध्वनी क्र. 7063064391,8003226315
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,रायगड अलिबाग (02141-222208)
                तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सदरच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजल पी. जाधव (निवृत्त)जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक