अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना आपले परवाना नुतनीकरण व नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न व औषध प्रशासन म.रा. पेण रायगड यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,किराणा, घाऊक विक्रेते,वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक,हॉटेलचालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉपधारक, दुध,मांस विक्रेते,अन्ने पदार्थ वाहतुकदार व इतर अन्न पदार्थ व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नुसार परवाना अथवा नोंदणी करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. उत्पादक,वितरक व घाऊक विक्रेते यांना परवाना अट क्र.14 नुसार विमा परवाना अथवा नोंदणी धारकास अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा विना परवाना अथवा नोंदणी धारकाकडून अन्न पदार्थांची खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना चे नुतनीकरणासाठी योग्य् त्या शुल्कासह दि.31 मार्च 2018 पूर्वी अन्न् व औषध प्रशासन म.रा.रायगड पेण कार्या...