भात पिकावरील खोडकिड प्रतिबंधासाठी उपाययोजना
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 कर्जत तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 9170 हेक्टर वर भात पिकाची लावणी झाली असून आतापर्यंत 3500 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत भात पिकाची जोमदार वाढ झाली असून भातपिक वाढीच्या अवस्थेत आहे. मर्यादित ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादूर्भाव झाला आहे परंतु पिक आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे. कृषि विभागामार्फत यासंदर्भात cropsap (कीड रोग सर्वेक्षण व सल्ला पध्दत) नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात करण्यात आली असून कर्जत तालुक्यात 23 कृषि सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत दिवसाआड कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जातात. कोणतीही कीड तसेच रोग आढळल्यावर संबधित शेतकरी यांना त्यासंबंधी उपाययोजना सांगितल्या जातात. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रमुख किडी व रोगांचे भित्तीपत्रके लावण्यात आली असून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांचेमार्फत कीड व रोगांची ओळख व त्यासंबधीच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु आहे. खोडकिड्यांच्या संदर्भात कर्जत तालुक्यात भात पिकात 2225 ए...