रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
रायगड जिल्हयाची 101 टक्के महसूल वसूली उद्दिष्टपूर्ती -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.31 (जिमाका), रायगड जिल्हयासाठी शासनाने दिलेल्या महसूल वसूली उद्दिष्टांची 101.88 टक्के अशी विक्रमी वसूली करण्यात आली. या वसूली बद्दल जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सन 2016-17 या वर्षासाठी रायगड जिल्हयाला अ पत्रकासाठी 86 कोटी, गौण खनिजासाठी 115 कोटी व करमणूक करासाठी 12.50 कोटी असे एकूण 213.47 कोटी एवढे वसूलीचे उद्दिष्ट शासनामार्फत देण्यात आले होते. 31 मार्च, 2017 अखेर या उद्दिष्टांपैकी अ पत्रक 95.58 कोटी, गौण खनिज 105.57 कोटी, करमणूक 15.71 कोटी असे एकूण 217.48 कोटी एवढी वसूली साध्य केलेली आहे. दिलेल्या व...