जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी -- पालकमंत्री ना.उदय सामंत
अलिबाग,दि.12(जिमाका) :- शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बियाणे, पीककर्ज पुरवठा सुरळीत होईल, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी त्याचबरोबर जिल्ह्यात भात वरी पिकांबरोबरच नाचणी, तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. पालकमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हा नियेाजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हा नियोजन सभागृहात आमदार रविंद्र पाटील, आ...