पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह चालविण्यास इच्छुक व्यक्ती/संस्थांनी निविदा सादर कराव्यात

 

 

          अलिबाग,दि.12 (जिमाका):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात एकूण पाच इमारती असून दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्याना येथे व्यवसाय शिक्षण दिले जाते. त्याकरिता उपलब्ध असलेला शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग जवळपास 200 च्या आसपास आहे. या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जेवण व अल्पोपहार तसेच इतर खादय पदार्थ स्वच्छ व स्वस्त दरात संस्थेच्या आवारात उपलब्ध करुन दयायचे असल्याने शासनाने घालून दिलेल्या खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला  गटाच्या आहार व्यवस्थापक ठेकेदारास " ज्यांना महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, अल्पोपहार, चहा, कॉफी इ. खादय पदार्थ उत्तमरित्या पुरविण्याचे व शासकीय खाजगी उपहारगृह अथवा  फिरते उपहारगृह (Mobile Canteen) चालविण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकरिता संबंधित अटी व शर्ती, निविदा सूचना, विहित निविदा नमुना व महत्वाच्या इतर सूचना या संस्थेत उपलब्ध करण्यात आलेल्या असून त्याच्या छापील प्रतींची किंमत रुपये 100/- अशी आहे.

             निविदे प्रक्रियेबद्दल अन्य काही महत्वाच्या अटी- करारपत्र 11 महिन्यांकरिता (Leave Licence ) पध्दतीने करण्यात येईल, करारनामा हा (Legal vetted) कायदेशीर असेल, जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त होईल त्या दरानुसार आकारण्यात येईल, वीज देयक/पाणी देयक स्वतंत्ररित्या आकारण्यात येईल.

            तरी इच्छुकांनी आपल्या सीलबंद निविदा विहित नमुन्यात दि.19 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या संस्थेत सादर कराव्यात, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नि.के.चौधरी  यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज