एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आरोग्य प्रशासनाचे आवाहन
अलिबाग,दि.22(जिमाका):- एच.आय.व्ही एड्स, गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष रायगड-अलिबाग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने व डापकूचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 फेब्रुवारी व दि.23 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अलिबाग, सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग व सायंकाळी 4.00 वाजता मुरुड तालुक्यातील रिक्षा स्टॅन्ड बोर्ली मांडला येथे कलापथकाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाले. दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जे.एस.डब्ल्यू कॉलनी पेण व सायंकाळी 4 वाजता मांडवा जेट्टी येथे कलापथकातून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल...