Posts

Showing posts from March 30, 2025

गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू

    रायगड जिमाका दि. 3:- राज्य शासनामार्फत ग्रामपातळीवर विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्याच्या विकासामध्ये ग्रामविकास आणि  लोकसहभाग खुप महत्वाचा असतो. या विकासाबाबत गावकऱ्यांचे अभिप्राय, अपेक्षा, समस्या आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज संवाद सेतू बांधला. निमित्त होते संवाद सेतू उपक्रमाचे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि गावकरी यांच्याशी हितगुज करण्यासाठी संवाद सेतू हा उपक्रम सुरु केला आहॆ. या उपक्रमंतर्गत आपटा आणि कर्नाळा ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, आरोग्य सेविक, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधला.   या उपक्रमाच्या माध्यमातून  गाव सक्षम करण्यावर आणि ग्राम विकासात लोकसहभाग वाढविणे तसेच समस्या तात्काळ सोडविण्यास प्राधान्य देणे हा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक आठवड्याला मंगळवार किंवा गुरुवार रोजी स. 10 वा हा संवाद सेतू कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. आपटा ग्रामपंचायत उपसरपंच चव...

आंबा फळांचा जाहिर लिलाव इच्छुक संस्था/व्यक्तीनी सहभाग घ्यावा

        रायगड(जिमाका)दि.02:- तालुका फळरोपवाटीका आवास ता.अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहिर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजीत करण्यात आली असून इच्छुक संस्था/व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटीकवर हजर रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी  केले आहे. तसेच फळबागतील फळ लिलाव संबंधी अटी व शर्ती व शासकीय निर्धारीत रक्कम तालुका फळरोपवाटीका आवास ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दि.03 एप्रिल 2025 रोजी पासून पहावयास मिळतील. लिलावात वाजवी दर नाही मिळाले तर पुढे वाढीव मुदत देणे / लिलाव रद्द करणे किंवा अंतिम निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार निम्न स्वाक्षरीत यांनी राखून ठेवले आहेत. ००००००

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करुन घ्यावी

      रायगड(जिमाका)दि.02:-  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि.10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्य : स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारां नी  आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे ( उदा.आधार ,  शैक्षणिक पात्रता ,  वय ,  अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार  यांनी  केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व ना वि न्यता विभागाच्या दि.09 जुलै   2024 अ न्व ये "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरु करण्यात आली आहे.    या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना...

7 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.02:-  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे एप्रिल 2025 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि.7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके यांनी दिली आहे. ००००००    

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.02:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.03 एप्रिल रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत तनिष हॉटेल अँड रिसॉर्ट, प्लॉट नं. 27, मेन रोड, हिंडाल्को कंपनी समोर, एम.आय.डी.सी. तळोजा, ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील बेरोजगारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु. पवार यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापनांमधील रिक्तपदांसाठी भरती केली जाणार आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवीधर आणि इतर पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया:  उमेदवारांनी  https://rojgar.mahaswayam.gov. in  संकेतस्थळावर जाऊन Employment Job Seeker या पर्यायातून लॉगिन करून शै...