आंबा फळांचा जाहिर लिलाव इच्छुक संस्था/व्यक्तीनी सहभाग घ्यावा

 

 

   रायगड(जिमाका)दि.02:-तालुका फळरोपवाटीका आवास ता.अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहिर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजीत करण्यात आली असून इच्छुक संस्था/व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटीकवर हजर रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी  केले आहे.

तसेच फळबागतील फळ लिलाव संबंधी अटी व शर्ती व शासकीय निर्धारीत रक्कम तालुका फळरोपवाटीका आवास ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटीकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दि.03 एप्रिल 2025 रोजी पासून पहावयास मिळतील. लिलावात वाजवी दर नाही मिळाले तर पुढे वाढीव मुदत देणे / लिलाव रद्द करणे किंवा अंतिम निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार निम्न स्वाक्षरीत यांनी राखून ठेवले आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान