Posts

Showing posts from September 13, 2026

पीएम विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांना कौशल्यविकासाची नवी दिशा --पालकमंत्री भरतशेठ गोगावले

Image
  रायगड-अलिबाग दि.१७ (जिमाका) :   पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी आणि उद्योजक बनविण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पात्र असलेल्या प्रत्येक कारागिरापर्यंत योजनेचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड आयोजित पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा  नियोजन भवन, अलिबाग येथे संपन्न झाला.  यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुधीर गायकवाड, उपायुक्त उद्योग व सेवा, जी.एस.हरळ्या, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी भागवत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. जे. डोलकर उपस्थित होते. पालकमंत्री श्री.गोगावले म्हणाले की, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात पारं...