जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ.भरत बास्टेवाड यांचे आवाहन
रायगड(जिमाका),दि.15:- गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. यासाठी https://tinyurl.com/ ganeshraigad2023 या गुगल लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या गुगल लिंक वर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत. फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन पाणी व स्वच्छता विषयी जनजागृतीसाठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्स, बॅनर्स, पोष्टर द्वारे जनजागृती करणे श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन कृत...