मेगा लेदर क्लस्टर प्रकल्प प्रस्तावावर जलदगतीने कार्यवाही करण्याचे मंत्री कु.तटकरे यांच्या सूचना


 

रायगड(जिमाका) 13 :- रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली. सर्व विभागानी एकमेकांच्या समन्वयाने प्रकल्पाच्या संबंधित सर्व प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

पादत्राणे व त्याच्याशी निगडित वस्तूंचे विविध उत्पादन युनिट्स तसेच, संशोधन केंद्र या अंतर्गत हा प्रकल्प होत आहे. 151 एकरावर 325 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हे पार्क साकारले जाणार आहे. लेदर उद्योगात काम करणाऱ्या उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाची विस्तृत आखणी करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या लेदर उद्योगाच्या प्रतिनिधींची बैठक महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ आणि लीडकॉम अधिकारी यांनी संयुक्तपणे आयोजित करावी. याबरोबरच इतर राज्यांमध्ये लेदर उद्योगासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रम, उपक्रम यांची माहिती घ्यावी, अभ्यास करावा. त्या आधारे सर्वसमावेशक कार्य प्रणाली निश्चित करून कार्यवाही करावी अशा सूचना मंत्री कु.तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.राज्याच्या चर्मोद्योग विकास महामंडळाचीदेखील यांत महत्त्वाची भूमिका असेल त्यांनी ही या प्रक्रियेस सहकार्य करावे अशा सुचानाही त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस सामाजिक न्याय विभाग, उद्योग विभाग आणि लीडकॉम चे अधिकारी  उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक