पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार ---महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे
.jpeg)
रायगड, (जिमाका)दि. 3:--महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पुढील काळात ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून त्याच प्रमाणे कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्यात येतील असे प्रतिपादन राज्याच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील इंदापूर व गोरेगाव प्रभागात ऊर्जा महिला प्रभाग संघ तलाशेत -इंदापूर व स्वाभिमान महिला प्रभाग संघ -गोरेगाव मार्फत दिवाळी सणानिमित आयोजित विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२ नोव्हेंबर रोजी महीला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, महीला स्वयंसहाय्यता समुहाच्या केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणार असून विक्रीसाठी दुकान-गाळे तसेच वरील मजल्यावर प्रभाग संघाचे कार्यालय करण्यात येईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन महिलांनी केल्याने महिलांचे कौतुक केले . सदर कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्...