पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार ---महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

 


रायगड, (जिमाका)दि. 3:--महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या  विक्रीसाठी पुढील काळात ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्याची सुविधा  उपलब्ध होणार असून त्याच प्रमाणे कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्यात येतील  असे प्रतिपादन राज्याच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील इंदापूर व गोरेगाव  प्रभागात  ऊर्जा महिला प्रभाग संघ तलाशेत -इंदापूर व स्वाभिमान महिला प्रभाग संघ -गोरेगाव मार्फत दिवाळी सणानिमित आयोजित  विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन  दि.२ नोव्हेंबर रोजी महीला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, महीला स्वयंसहाय्यता समुहाच्या केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणार असून  विक्रीसाठी दुकान-गाळे तसेच वरील  मजल्यावर प्रभाग संघाचे कार्यालय करण्यात येईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन महिलांनी केल्याने महिलांचे कौतुक केले .

 सदर कार्यक्रमासाठी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उमेद जिल्हा व्यवस्थापक  सिद्धेश चंद्रकांत राऊळ,  गट विकास अधिकारी माणगाव श्री.जठार, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी अशोक चव्हाण,   प्रभाग संघाचे , ग्राम संघाचे पदाधिकारी, महीला स्वयं सहाय्यता समूहातील महीला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या.

सदरच्या विक्री प्रदर्शनात दिवाळी सजावट,फराळ, रांगोळी, शोभेच्या वस्तु, पणत्या, एमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड कपडे इत्यादी वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते. इंदापूर येथे प्रभाग संघामार्फत 10 स्टॉल चे व गोरेगाव येथे 30 समूहाचे स्टॉल लावण्यात आले होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज