Posts

Showing posts from April 4, 2021

रायगड राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक 2 ची उल्लेखनीय कामगिरी अवैध गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्यसाठा व कार जप्त

    अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):-   निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2. पनवेल यांना माहिती मिळाल्यानंतर त्या पथकांनी दि.07 एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील मौजे निलकंठ स्वीट समोर, सेक्टर 20, खारघर, येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवून छापा घातला. या छाप्यात   एम.एच.46 ए.एल 4453 या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इरटिगा कंपनीच्या कारमधून गोवा निर्मित विदेशी मद्याच्या 36x750 मिलिलीटर क्षमतेच्या, 12 हजार 375 मिलिलीटर क्षमतेच्या, 1 लाख 94 हजार 180 मिलिलीटर क्षमतेच्या 45 लाख 64 हजार 500 मिलिलीटर क्षमतेचे स्ट्रॉग बिअरचे सीलबंद कॅन व एक अॅपल कंपनीचा 45 आयफोन मोबाईल सिमकार्ड सहीत 1) मुलावरअली रोजनअली शेख, वय 46 वर्षे रा. रुम नं.1001, केसेंट हायलाईट, सेक्टर 35 डी, प्लॉट नंबर 4, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड. 2) वाजिद नूर सय्यद, वय 24 वर्षे रा. बिरोबा रोड, कालिकानगर, डॉ. वपे हॉस्पिटल, मु/ पो. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, 3) साईनाथ श्रीमंत पटाले, वय 29 वर्षे रा. बिरोबा रोड, कालिका नगर, डॉ. वपे हॉस्पिटल, मु./पो. शिर्डी, ता.राहता, जि. अ...

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

            अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):-   जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांखिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार मार्च, 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापना...

नवीन “आपले सरकार सेवा केंद्रा”साठी इच्छुकांनी अर्ज करावेत

  अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “ आपले सरकार सेवा केंद्र" हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येतील. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.  जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व “ आपले सरकार सेवा केंद्रा ” साठी इच्छुक नागरिकांनी वरील संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासंह दि.11 मे 2021 पर्यत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत. “ आपले सरकार सेवा केंद्रा ” बाबत अ...

करोना जनजागृतीसाठी सरसावले नागरी संरक्षण दल

    अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात करोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.             या माध्यमातून नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी, गर्दी न करण्याविषयी, ताप, सर्दी, खोकला यासारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदतीकरिता जाण्याविषयी, वय वर्ष 45 वरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.               आज (दि.9) चिरनेर बस स्थानक, उरण मुख्य बाजारपेठ, उरण ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय या ठिकाणी श्री.विलास पाटील, नागरी संरक्षण, उरण   प्र.लिपिक, श्री.ना.के म्हात्रे, वाहनचालक यांनी   करोनाबाबत जनजागृती केली. यासाठी त्यांना उपनियंत्रक,नागरी संरक्षण दल, रायगड श्रीमती राजेश्वरी कोरी यांचे मोलाचे मार्गद...

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 716 लाभार्थ्यांनी घेतला लसीकरणाचा लाभ

  वृत्त क्रमांक:- 282                                                          दिनांक:- 08 एप्रिल 2021   अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- शासनाकडून आतापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसचे 1 लाख 34 हजार 200 व कोव्हॅक्सिनचे 15 हजार 820 डोस प्राप्त झाले आहेत.      कोविशिल्डच्या लसींचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे 28 हजार 280, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 34 हजार 370, पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे 48 हजार 500, खाजगी रुग्णालयांना 6 हजार 500, आर्मड् फोर्सेसना 3 हजार 950 असे वितरण झाले होते. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिनच्या एकूण 15 हजार 820 लस प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 9 हजार 820 तर पनवेल महानगरपालिकेकडे 6 हजार लस वितरित करण्यात आल्या होत्या. जिल्ह्य...

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे,हात वारंवार स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे करा पालन जिल्ह्यात 69 हजार 993 जणांनी केली करोनावर मात

              अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- आतापर्यंत म्हणजेच दि. 7 एप्रिल 2021 पर्यंत जिल्ह्यातील 69 हजार 993 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून 934 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 562, पनवेल ग्रामीण-779, उरण-160, खालापूर-231, कर्जत-204, पेण-249, अलिबाग-443, मुरुड-22, माणगाव-148, तळा-8, रोहा-123, सुधागड-50, श्रीवर्धन-45, म्हसळा-24, महाड-74, पोलादपूर-15 अशी एकूण 6 हजार 137 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-34 हजार 722, पनवेल ग्रामीण-9 हजार 199, उरण-2 हजार 326, खालापूर-3 हजार 165, कर्जत- 1 हजार 997, पेण-4 हजार 285, अलिबाग-5 हजार 324, मुरुड-465, माणगाव- 2 हजार 146, तळा-175, रोहा-2 हजार 624, सुधागड-464, श्रीवर्धन-451, म...

कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुधारित मनाई आदेश जारी अत्यावश्यक सेवेत अन्य काही बाबींचा समावेश

    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बधांच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दि.05 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 8.00 वा. पासून ते दि.30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वा. पर्यंत कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड निधी चौधरी यांनी फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कलम 144 (1) (3) नुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेत खालील बाबीदेखील समाविष्ट असल्याची माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थाशी निगडीत सेवा, गॅस पुरवठा, सर्व प्रकारची कार्गो सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा, डाटा सेंटर/क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर/टेलिकॉम सर्विस/आयटी सर्व्हिसेस सपोर्टंग क्रिटीकल, ईन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस, शासकीय व खाजगी सुरक्ष...

माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी प्राप्त पदक पुराव्यासह माहिती दि.15 एप्रिल पूर्वी सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- सन - 1962, सन-1965, सन-1971 च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या अनुक्रमे   LADAKH-1962 CLASP/NEFA1962 CLASP, रक्षा पदक/समर सेवा स्टार, संग्राम पदक अशा   पदकांनी सन्मानित   व निवृती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिक किंवा त्यांच्या   पश्चात माजी सैनिक विधवांची   माहिती दि.15 एप्रिल 2021 पूर्वी सैनिक कल्याण विभागामार्फत शासनास सादर करावयाची आहे. त्यासाठी संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी प्राप्त पदक पुराव्यासह आपली माहिती तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण रायगड-अलिबाग यांच्याकडे स्वहस्ते सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग मेजर (निवृत) सुभाष सासने यांनी केले आहे.   ०००००००

कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग झाला सज्ज

  वृत्त क्रमांक:- 278                                                           दिनांक:- 08 एप्रिल 2021   अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोविड-19 रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानांतर्गत दि. 04 एप्रिल 2021 रोजी आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशांमधील पशुसंवर्धन विभागाशी निगडीत असलेल्या बाबींची अंमलबजावणी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने तात्काळ सुरु केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फूड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबडया, मटन, अंडी, मासे दुकानांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/ कु...

सज्ज रहा..सावध रहा करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा…!

  विशेष लेख क्र.22                                                               दिनांक :- 07 एप्रिल 2021   राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने   शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत तर Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown - MISSION BEGIN AGAIN अंतर्गत वेळोवेळी मानक कार्यप्रणालीचा (SOP) अवलंब करुन, काही बाबी सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेही रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार दि.05 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2021...

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे,हात वारंवार स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे करा पालन जिल्ह्यात 69 हजार 500 जणांनी केली करोनावर मात

              अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- आतापर्यंत म्हणजेच दि. 6 एप्रिल 2021 पर्यंत जिल्ह्यातील 69 हजार 500 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून 845 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 299, पनवेल ग्रामीण-761, उरण-143, खालापूर-208, कर्जत-197, पेण-227, अलिबाग-382, मुरुड-22, माणगाव-152, तळा-9, रोहा-105, सुधागड-47, श्रीवर्धन-42, म्हसळा-20, महाड-72, पोलादपूर-14 अशी एकूण 5 हजार 700 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-34 हजार 442, पनवेल ग्रामीण-9 हजार 136, उरण-2 हजार 303, खालापूर-3 हजार 139, कर्जत- 1 हजार 982, पेण-4 हजार 277, अलिबाग-5 हजार 309, मुरुड-463, माणगाव- 2 हजार 111, तळा-172, रोहा-2 हजार 622, सुधागड-456, श्रीवर्धन-451, म...

वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आहे सज्ज

  अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):- दिवसेंदिवस राज्यात कोविड-19 चा प्रादूर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी या संकटाचा धैर्याने मुकाबला करणे आवश्यक आहे.   शासन आणि प्रशासन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.      मागच्या काही काळात शासन व प्रशासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले असून, आरोग्य विषयक अधिक सोयी-सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. शासनाने नुकतेच वय वर्ष 45 वरील सर्व नागरिकांना प्रतिबंध लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.   करोनाच्या दोन लसींचा डोस पूर्ण केल्यानंतर आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि समजा चुकून करोना झाला, तरीदेखील या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रभावामुळे संबंधित व्यक्ती गंभीर आजारी होणार नाही व ते करोनातून निश्चितपणे पूर्ण बरे होतील. तरी वय वर्ष 45 वरील प्रत्येक नागरिकाने जवळच्या लसीकरण केंद्रात जावे व लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   जिल्हा शल्य चिकित्सक...