चिरनेर, दिघोडे ग्रा.पं.निवडणूक;स्वाधीन अधिकाऱ्यास अधिकार प्रदान
अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.2- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 चा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्यामुळे 24 नोव्हेंबर, पासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 पनवेल विभागातील उरण पोलीस ठाणे हद्दीत 1) चिरनेर, 2) दिघोडे ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून 26 डिसेंबर, रोजी मतदान व 27 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत तेथील कायदास सुव्यवस्था अबाधित रहावी व मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 36 प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार नवी मुंबई पोलीस आयुकतालय हद्दीतील चिरनेर, दिघोटी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने परिमंडळ-2 पनवेल मधील उरण पोलीस ठाणेचे स्वाधीन अधिकारी मिरवणूकीचा मार्ग व वेळ निश्चित करणे, जमावाचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे, ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करुन दिलेली वेळ यावर , जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत...