जिल्हा रुग्णालयात मौखिक स्वास्थ्य तपासणी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- येथील जिल्हा रुग्णालया मौखिक स्वास्थ मोहिमेनिमित्त मौखिक स्वास्थ्य तपासणीचे आयोजन दि.२ ते ३१ डिसेंबर या कालावधी करण्यात आले आहे. या मोहिमेचे उदघाटन  शनिवारी  जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, डॉ. शैलेश धारवाडकर डॉ.मेहता, दंतशल्यचिकित्सक डॉ.ऋतुजा माळी, डॉ. प्रियंका पिंगळे, अधिसेविका श्रीम.मोरे, दंतरोग तज्ज्ञ जय प्रकाश वाघ आदी  उपस्थित हेाते.
या मोहिमेद्वारे जनजागृती व मुख तपासणी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय अलिबाग  व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान