Posts

Showing posts from June 14, 2026

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

                  रायगड-अलिबाग, दि. 16 (जिमाका) : शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत 2025-26 हंगामात राज्यातील 56 समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 1 हजार 724 कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल 1 लाख 08 हजार 596 कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले असून, एकूण उबवण यशाचे प्रमाण 61.20 टक्के नोंदविण्यात आले आहे.               महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदविण्यात आली असून, त्यामधून 54 हजार 227 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53 हजार 325 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून, 69.95 टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1 हजार 44 पिल्लांना स...