लॉकडाऊन दरम्यान जिल्हांतर्गत अडकलेल्या नागरिकांच्या परतीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची विशेष व्यवस्था सुरु
वृत्त क्रमांक :- 311 दिनांक :- 09 मे 2020 अलिबाग,दि.9 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन कालावधी दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू...