जिल्हाधिकारी निधी चौधरींचे नागरिकांना आवाहन.. वयोवृद्धांची काळजी घ्या..!



अलिबाग, जि.रायगड,दि.6 (जिमाका) - सध्या कराेनाचा प्रादूर्भाव काही ठिकाणी आढळत आहे. या आजारात ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे, असे प्राथमिक निरीक्षण आहे.
             या परिस्थितीत मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे (कमीत कमी तीन फूट अंतर), सॅनिटायजरचा वापर करणे, हात वारंवार साबणाने धुणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे या बाबींचा कटाक्षाने वापर आवश्यक आहे.  
              या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वतःपासूनच सुरुवात केली आहे ती सर्वांना आवाहन करीत की, वयोवृद्धांची काळजी घ्या..! या सामाजिक, कौटुंबिक संदेशातून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्व-कृतीतून इतरांनाही प्रेरित केले आहे..चला आपण या संकटकाळातच नव्हे तर कायमच आपल्या घरातील,समाजातील वयोवृद्धांची काळजी घेऊया!
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान