पालकमंत्री यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद

अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.02 : अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज, पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, जिल्हा प्रशासनास, यांना लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास सादर करावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी पालकमंत्री यांच्या सोबत अलिबाग आमदार महेंद्र दळवी, पेण आमदार रविशेठ पाटील, पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकरी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, महसूल, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000