अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा चनामे तात्काळ करावेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.02 : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करुन शेतकऱ्यांना जास्तीतजास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले.  अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा  बैठकीत  ते बोलत होते.
यावेळी आमदार महेंद्र दळवी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, तहसिलदार सचिन शेजाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी  आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, यावर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस झाला आहे.  या पावसाची तीव्रता ऑक्टोबरमध्ये अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी.  शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना मोबदला देण्याची कार्यवाही करावी अशा सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक