मराठी भाषा संवर्धनासाठी आपण सारे होऊ कटिबद्ध..! -पत्रकार नागेश कुलकर्णी
अलिबाग,दि.14 (जिमाका) :- शासनाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे, तुम्ही-आम्ही सारे या निमित्ताने मराठी भाषा संवर्धनासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष श्री.नागेश कुलकर्णी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” या उपक्रमाचा दिमाखदार उद्घाटन कार्यक्रम कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार विशाल दौंडकर व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. श्री.नागेश कुलकर्णी पुढे म्हणाले की, मराठी भाषा आपला स्वाभिमान आहे. आ...