Posts

Showing posts from October 8, 2017

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत मुदत

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यात भारत सरकार द्वारा (मानव संशोधन विकास मंत्रालय)येथे चालविल्या जाणाऱ्या जवाहर   नवोदय विद्यालय या निवासी विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2018 साठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार दि.10 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियोजीत परीक्षा केंद्रांवर होणार आहे.या प्रवेश परीक्षेचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया या वर्षापासून ऑनलाईन करण्यात आलेली असून प्रवेश अर्ज दि.25 सप्टेंबर 2017 पासून   www.nvshq.org   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची   शेवटची मुदत 25 नोव्हेंबर 2017 आहे. प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची पद्धत पुढीलप्रमाणे-   प्रथम वरील संकेतस्थळावरुन Certificateडाऊनलोड करुन घ्यावे व त्याची झेराक्स् कॉपी घेऊन विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता पाचवी च्या वर्गात शिकत आहे त्या शाळेत जाऊन संपूर्ण फॉर्म काटेकोरपणे तसेच सर्व रकाने व्यवस्थित भरुन त्याच्यावर पालकांची सही घ्यावी व नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांची सही घेऊन शाळेचा शिक्का मारावा. नंतर हा संपूर्ण भरलेला फॉर्म घेऊन स्वताच्या पालकांसोबत आपल्या जवळपास असणाऱ्या से

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात 16 रोजी सुटी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी पार पडणार आहेत.             त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, यांनी निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सोमवार, दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त   निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत मतदार असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग,उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने,दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना   पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य् नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र याबाबत त्यांनी संबंधित   महानगरपालिक आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची   पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्य

वाचन प्रेरणा दिवस पुस्तके हीच खरी ज्ञानाची साधने- डॉ. मिलिंद दुसाने

Image
        अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.13- आजच्या युगात मोबाईल, टॅब सारख्या अनेक साधनांद्वारे आपल्या एका क्लिकवर जगभरातील माहिती उपलब्ध आहे. परंतू आपण माहितीचे साधने ज्ञानाची साधने समजत आहोत. मात्र असे न समजता ज्ञानसंपादन करण्यासाठी अधिकाधिक ग्रंथवाचन केले पाहिजे कारण पुस्तके हीच खरी ज्ञानाची साधने आहेत, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज येथे केले.  येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. दुसाने बोलत होते.  माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (दि.15 ऑक्टोबर) आज वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वाचन कक्षात वाचकांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डी. बी वळवी, प्रा. श्याम जोगळेकर, श्रीमती विभावरी कांबळे, तांत्रिक सहाय्यक अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अ

अंडीःआहारातील उच्च प्रथिनांचा स्त्रोत

जागतिक अंडी दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये अंड्यांच्या सेवनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अल्प दरामध्ये उपलब्ध होणारी अत्युच्च दर्जाची प्रथिने (प्रोटीन्स्) यांचा वापर करुन कुपोषण दुर करणे हा होय.             आयआयटी दिल्ली येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. ऋतिका खेडा यांनी भुकबळी, कुपोषणावर   सादर केलेली वस्तूस्थिती अत्यंत भयावह आणि धक्का देणारी आहे. जागतिक स्तरावर खाद्य उपलब्धता व कुपोषण यावर संशोधन करणाऱ्या संस्थांनी जाहीर केलेली आकडेवारी विचार करण्यास भाग पाडणारी आहे. कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात भारत 118 कुपोषण रास्त् देशांमध्ये 97 व्या स्थान आहे. भारतामध्ये कुपोषणग्रस्त् लोकांची संख्या 19.46 कोटी असून 1 ते 5 वयोगटातील 44 टक्के मुलांचे वजन सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात दरवर्षी   2.1 दशलक्ष मेट्रीक टन गव्हाची नासाडी होते ती ऑस्ट्रेलियाच्या एकूण वार्षिक गहू उत्पादनाइतकी आहे.             कुपोषण निर्मुलन करण्यासाठी समावेशक प्रथिन स्त्रोत अंड्यांचा करसा उपयोग करता येईल याबाबत चर्चा होणे गरजेचे असून अंड्याचे महत्व् जाणले पाहिजे. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या शिफार

रक्तदान जनजागृतीसाठी प्रभातफेरी

Image
        अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- रक्तदानाविषयक समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या वतीने  आज अलिबाग शहरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते या प्रभात फेरीस हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी   अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास कोरे, अधिसेविका जयश्री मोरे, डॉ. अनिल फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेते सुजित पाटील व प्रणाली जमदाडे यांना प्रथम क्रमांक, मनाली पाटील व विनीता पाटील यांना द्वितीय क्रमांक, प्रणाली चांदोरकर व भाविका भोईर यांना तृतीय  क्रमांक विभागून पारितोषिक देण्यात आले. तसेच नियमित रक्तदात्यांचा सत्कारही करण्यात आला. या रॅलीत जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय, रोटरी क्लबचे डॉ. सुनिल भोपाळे, प्रिझम सामाजिक संस्थेच्या तपस्वी गोंधळी, रुरल यंग फाऊंडेशन, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज,  जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग  ट्रेनिंग सेंटरच्या  विद्यार्थिनी,  स्वयंसिद्धा सामाजिक संस्थेच्या सुचिता साळवी आदींची उपस्थित होती. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी  शासकीय रक्तप

पर्यटन पर्व उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
        अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दि.5 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 'पर्यटन पर्व'हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन वृद्धीसाठी विविध उपकम राबविण्यात येत आहे. त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, डॉ. बबन जोगदंड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे डी.एन. करंजकर आदी उपस्थित होते. ०००००

'विकास संवाद' कार्यशाळा माध्यमे ही शासनाची ज्ञानेंद्रीय- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
        अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- विकास विषयक उपक्रम राबवितांना शासन यंत्रणेला माध्यमे ही योग्य अशा प्रसिद्धीतून आवश्यक प्रतिसाद देत असतात. त्यामुळे शासकीय यंत्रणेला योग्य त्या सुधारणा करण्यास वाव मिळतो; एक प्रकारे माध्यमे ही शासनाची ज्ञानेंद्रीयच आहेत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित 'विकास संवाद' कार्यशाळेचे आज जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या विविध विभागांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करुन त्यासंदर्भात माध्यमांमधील तज्ज्ञ संपादक, प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी आज  जिल्हाधिकारी कार्यालयात 'विकास संवाद' व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या व ज्येष्ठ पत्रका

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14.97 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.11-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी14.97मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3674. 81 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 22.00 मि.मि., पेण-30.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-180.00 मि.मि., उरण-02.00 मि.मि., कर्जत-75.00 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-05.00 मि.मि., सुधागड-03.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-02.00 मि.मि., पोलादपूर-09.00, म्हसळा-03.00 मि.मि., श्रीवर्धन-03.00 मि.मि., माथेरान-27.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमा2न 239.50मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.97मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   116.93% इतकी आहे. 00000

भात पिकावरील किडरोग सल्ला

सध्या भात पिक फुलोरा ते कापणी अवस्थेत आहे. लष्करी अळी किंवा तुडतुडे प्रादुर्भाव आढळल्यास खाली प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करतांना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. भात पीक 90ते 95 टक्के तयार होताच वैभव विळ्याने जमीनीलगत कापणी करावी पावसाचा अंदाज पाहून कापणी करावी व पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. भात पिकावरील किड रोग सल्ला प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानुसार‍ किड रोग नियंत्रण बाबत सल्ले (ॲडव्हायजरी) वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय वार्ताफलक, वृत्तपत्राद्वारे व विविध कार्यक्रमाद्वारे प्रसिद्धी देण्यात येत आहे. लष्करीआळी-   या किडीच्या अळया दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात. पाने कडे पासून ते मध्यशिरेपर्यंत खात असल्यामुळे नुकसानी वरुन कीड चटकन ओळखून येते.किडीचा खरा उपद्रव मात्र पिक काढणीच्यावेळी होतो. या किडीच्या अळ्या लोंब्या कुरडतात त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते. नियंत्रणाचे उपाय- पिक तयार होताच कापणी करावी. चार ते पाच अळ्या प्रती चौ.मी. आढळताच संध्याकाळच्या सुमारास मिथिल पॅराथीऑन   दोन टक्के भुकटी 8 किलो प्रति एकर धुरळावी. भाताची कापणी झा

किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी

रायगड जिल्ह्यात आंबा हे प्रमुख फळपीक असुन माहे डिसेंबर - जानेवारी पासुनच मोहोर बहरण्याच्या कालावधीची सुरुवात होते. अधिक व दर्जेदार उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातुन आंबा बागायतदार, आंब्यावरील किड-रोगाच्या नियंत्रणाकरीता वेगवेगळया किटकनाशकांची मोठ्याप्रमाणावर वेळोवेळी फवारणी करतात. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक किटकनाशके,तणनाशके तसेच बुरशीनाशके फवारणी करताना किंवा ती हाताळताना खालील सुचनांचे पालन शेतकरी बांधवांनी करावे. रासायनिक औषधांचे अत्यंत बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना ,   पितांना शरीरात जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी- गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा   (चाडीचा)   वापर करावा., तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत.झिजलेले ,   खराब झाले

आपत्ती निवारण जनजागृती सप्ताह : जिल्ह्यात विविध कार्यक्रम; आरसीएफ येथे रंगीत तालीम

Image
         अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10-   संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार 13 ऑक्टोबर हा जागतिक आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आपत्ती व्य्वस्थापन व निवारणा विषयी जनजागृती होण्यासाठी दि.9 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येतात. रायगड जिल्हा प्रशासनातर्फेही हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ते याप्रमाणे- दिनांक 11ऑक्टोबर रोजी रंगीत तालिम (जिल्हास्तर)- उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल,उरण., दि.12 रोजी आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भूमिका या विषयावर कार्यशाळा-   जिल्हा माहिती कार्यालय,रायगड अलिबाग., दि.13 ऑक्टोबर कार्यशाळा जिल्हास्तर-महसूल विभाग , चित्ररथाद्वारे जनजागृती- महसूल विभाग, 75 शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण,जनजागृती अभियान,शिक्षण विभाग व नागरी संरक्षण दल,उरण, अग्निशमनदलाच्या माध्यमातून रंगीत तालीम व जनजागृती अभियान (नगरपालिकास्तर)–संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, गृहरक्षक दल, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण (जिल्हास्तर) -पोलीस विभाग., महिलांसाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण आयोजित करणे- ग्र

चाणजे ता.उरण : पोटनिवडणूक प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10-   राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी त्यांच्या दिनांक 4ऑक्टोबर 2017 रोजीच्या पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण पंचायत समिती निर्वाचक गण 56 चाणजे पोटनिवडणूकीबाबत  प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी बाबत कार्यक्रम दिला आहे तो पुढीलप्रमाणे- दिनांक 10 ऑक्टोबर 2017 रोजी   प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करुन प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक दि. 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत.तसेच प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित    करुन प्रसिद्ध करणे- दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी, असे जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे. 000000

राज्य महिला आयोगाची गुरुवारी ठाणे येथे जनसुनावणी

अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10-   महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2017 रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर ,नवी मुंबईतील महिलांच्या   तक्रारींचे निवारण करणार आहे.यावेळी अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न् करत आहे. महिलांना न्याय मिळावा.यासाठी महिला आयेाग आपल्या दारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभागस्तरावर महिलांच्या   तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीसाठी उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमांचा फायदा होणार आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारी दाखल करुन त्याच ठिकाणी त्यावर कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरीत दिलास देण्याचं काम आयोग याद्वारे करत आहे. दि.12 रोजी या संकल्

जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी 'विकास संवाद' कार्यशाळ : 'आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची भुमिका' याविषयावरही मार्गदर्शन

         अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10-   शासनाच्या विविध विभागांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करुन त्यासंदर्भात माध्यमांमधील तज्ज्ञ संपादक, प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी गुरुवार दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'विकास संवाद' कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी 'आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची भूमिका' याविषयावर डॉ. बबन जोगदंड यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात  गुरुवार दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पा रसकर, कोकण विभागाचे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, तसेच मान्यवर संपादक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी शासनाचे विविध विभागांमार्फत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 06.79मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.10-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी06.79 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3659. 84 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-09.00 मि.मि., कर्जत-23.50 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-06.00 मि.मि., तळा-03.00 मि.मि., महाड-15.00 मि.मि., पोलादपूर-03.00, म्हसळा-42.60 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-06.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 108.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 06.79मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   116.46% इतकी आहे. 00000