आपत्ती निवारण जनजागृती सप्ताह : जिल्ह्यात विविध कार्यक्रम; आरसीएफ येथे रंगीत तालीम
अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.10- संयुक्त राष्ट्र संघांनी
घोषित केल्यानुसार 13 ऑक्टोबर हा जागतिक आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा केला
जातो. यानिमित्ताने आपत्ती व्य्वस्थापन व निवारणा विषयी जनजागृती होण्यासाठी दि.9
ते 13 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येतात. रायगड जिल्हा
प्रशासनातर्फेही हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ते याप्रमाणे-
दिनांक 11ऑक्टोबर रोजी रंगीत तालिम
(जिल्हास्तर)- उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल,उरण.,
दि.12 रोजी आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांच्या
प्रतिनिधींची भूमिका या विषयावर कार्यशाळा- जिल्हा माहिती
कार्यालय,रायगड अलिबाग.,
दि.13 ऑक्टोबर कार्यशाळा जिल्हास्तर-महसूल
विभाग ,
चित्ररथाद्वारे जनजागृती- महसूल विभाग,
75 शाळा-महाविद्यालयांमध्ये
प्रशिक्षण,जनजागृती अभियान,शिक्षण विभाग व नागरी संरक्षण दल,उरण,
अग्निशमनदलाच्या माध्यमातून रंगीत तालीम व
जनजागृती अभियान (नगरपालिकास्तर)–संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, गृहरक्षक दल,
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण
(जिल्हास्तर) -पोलीस विभाग.,
महिलांसाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण आयोजित
करणे- ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र
याप्रमाणे जनजागृती उपकमांचे आयोजन दि. 13 पर्यंत करण्यात
आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय
सुर्यवंशी,यांनी केले आहे.
आरसीएफ
कंपनीत रंगीत तालीम
जागतिक आपत्ती निवारण सप्ताह निमित्ताने आज राष्ट्रीय केमिकल अँड
फर्टिलायझर (आरसीएफ) कंपनी येथे जिल्हास्तरीय रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले.या
प्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर, कार्यकारी संचालक जावळे, तहसीलदार
संकपाळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग
उपसंचालक पाटील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
या प्रसंगी टँकर मधून अमोनिया वायू गळती होऊन त्याचा त्रास आजूबाजूला
होऊन अपघात होऊ नये म्हणून सर्व शासकीय विभागांशी समनव्यातुन आपत्ती निवारण
करण्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
पेझारी येथे चित्रकला व निबंध स्पर्धा
जि प शाळा पेझारी येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विविध
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी सागर पाठक यांनी केले. तर निंबध स्पर्धेचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी गवळी
यांनी केले. घोष वाक्ये स्पर्धेचे उद्घाटन श्री म्हात्रे यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अलिबाग कोकाटे,
उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शेडगे,विस्ताराधिकारी पंचायत समिती अलिबाग पिंगळा, साधनव्यक्ती
प्रशांत ठाकूर उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन याविषयावर पाठक व गवळी यांनी
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक नितिष पाटील यांनी केले.
00000
Comments
Post a Comment