अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- भारतीय तटरक्षक दलाच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवीमुंबई येथील भारतीय तटरक्षक दलाच्या सरोवर विहार या परिसरात मच्छिमार बांधवांचा मेळावा पार पडला. यावेळी रायगड व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना सागरी सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तटरक्षक दल व मच्छिमार बांधव यांच्यात मैत्रीपूर्ण व्हॉलीबाल सामनाही खेळण्यात आला. याप्रसंगी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विवेक वाजपेयी, महाराष्ट्र समादेशक मुकूल गर्ग यांची विशेष उपस्थिती होती. या स्नेह मेळाव्यात करंजा, उरण, मोरा, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली,बेलापूर,दिवाळे येथून मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी व मच्छिमार बांधवांनी परस्पर उदबोधन सत्रात समुद्रातील सुरक्षा उपायांबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. त्यात लाईफ जॅकेट, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करताना शासन...