‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत वडखळ येथे लाभ वाटप : योजनांचा लाभ पोहोचल्याने गावांचा विकास-पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ‘आमचा गाव आमचा विकास’, च्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या  विविध योजनांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका क्षेत्रासाठी लाभार्थ्यांना लाभ वाटप झाल्याने गावांचा विकास होत आहे, प्रतिपादन  राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी वडखळ ता. पेण येथे (दि.16 रोजी) केले.  वडखळ ग्रामपंचातीने राबविलेला हा विकासात्मक कार्यक्रम स्तुत्य असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
            वडखळ ग्रामपंचायतींमार्फत आयोजित या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचेआमदार प्रशांत ठाकूर, पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रितम पाटील, पेण तहसिलदार अजय पाटणे, वडखळ सरपंच राजेश मोकल, उपसरपंच रविंद्र म्हात्रे, पेण गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, गोरगरीब जनतेचा विकास व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजना वडखळ ग्रामपंचातीमार्फत आरोग्य, शिक्षण व उपजिविकांच्या लाभासाठी वडखळ परिसरातील जनतेपर्यंत पोहचत आहेत.  खारेपाट परिसरातील पाण्याची समस्या दूर व्हावी याकरिता शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  तसेच या परिसरातील उद्योगांकडून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.  महिलांसाठी मोफत गॅस, बेटी बचाओ बेटी पढाओ, गरोदर मातांना पोषण आहार, घरकुल योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत  असून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राथमिक शाळांना संगणक, दप्तर वाटप, अंगणवाडीतील मुलांना सकस आहार, मुलींच्या जन्माचे स्वागत, अपंग व्यक्तींसाठी अनुदान वाटप, आदिवासी वाडीतील शाळांना साऊंड सिस्टीमचे वाटप यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास वडखळ परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज