आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग, (जिमाका)दि.8:- येत्या मान्सुनमध्ये जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मदत व बचाव कार्य तत्परतेने होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सून-2017पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, रविंद्र बोंबले,बाळासाहेब तिरके, प्रविण पवार,अमरसिंग भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक,तसेच तहसिलदार, नगरपरिषद ...