“आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75” युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात आयोजित केलेल्या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका) :- “ आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 ” च्या महोत्सवाचा भाग म्हणून युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित केले आहे. दि.12 मार्च 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सवाच्या वेळी भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन प्रसंगीच्या भाषणातून प्रेरणा घेऊन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने कृती आणि संकल्पांच्या आधारे “ आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 ” साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे. या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने केले आहे. “ फिट इंडिया फ्रीडम रन ” ची कल्पना गेल्या वर्षी कोविड -19 महामारीच्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती. त्यावेळी सामाजिक अंतर ठेवून राहाणे, ही नवीन सामान्य जीवनशैली बनली होती, जेणेकरून सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करतानाही फिटनेसची अत्यावश्यक गरज कायम ठेवता येणार होती. फिट इंडिया फ्रीडम रन व्हर्च्युअल रन या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. याचाच अर्थ 'आपण...