वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत
रायगड(जिमाका),दि.21 : - पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुनिल जाधव यांनी केले आहे. बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता, निवासभत्ता व निर्वाहभत्ता उपलब्ध करुन दिला जात आहे. काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना :- गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांन...