10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 


 

रायगड(जिमाका),दि.21 :- जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम अलिबाग पोलीस मुख्यालयातील जंजिरा हॉल येथे सकाळी 07.00 वा संपन्न झाला.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर, नेहरु युवा केंद्र समन्वयक  निशांत रौतेला, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम.तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, पोलीस विभागातील कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत