Posts

Showing posts from February 1, 2026

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट

Image
  रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.  या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.      मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, वरसोली, सेंट मेरी हाय स्कूल  मतदान केंद्रे तसेच नेहुळी येथील मतमोजणी केंद्र,साहित्य वितरण केंद्र, स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र शेळके, अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.      मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्णतः सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर,प्रथमोपचार किट, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र अस...

राज्याचे युवा धोरण-2012 अंतर्गत जिल्हास्तरावर युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका ) :-   आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान व त्यामुळे जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर राज्याचे क्रीडा धोरण-2012 अंतर्गत 2022-23, 2023-24 व 2024-25 करिता जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी जास्तीत जास्त युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी दि.28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड प्रकाश वाघ यांनी आवाहन केले आहे. जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप हे एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. हा पुरस्कार हा गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.10000/- (प्रती युवक व युवतींसाठी) तर प्रती संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 50,000/- अशा स्वरुपाचा असेल. अर्जदार युवक युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 01 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराचे वास्तव्य किमान 5 वर्षे जिल्ह्यात असणे आवश्यक आ...

कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

Image
    रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका ) :-  "कर्करोग हा जगातील सर्वात गंभीर आणि जीवघेण्या आजारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यु या आजारामुळे होतो, कर्करोगाबाबत जनजागृती वाढावी, वेळेवर त्तपासणी आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतीक कर्करोग दिन साजरा केला जातो. सदर जागतीक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कारागृहातील दाखल बंद्यांमध्ये जनजागृती व्हावी तसंच कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याची माहित्ती देण्यासाठी नुकताच अलिबाग जिल्हा कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, वर्ग-2 विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था, अलिबाग डॉ. मिलिंद पाटील, व उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबाग डॉ.नितीन गांधी  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक कर्क...