राज्याचे युवा धोरण-2012 अंतर्गत जिल्हास्तरावर युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

 

 

रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका) :- आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान व त्यामुळे जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर राज्याचे क्रीडा धोरण-2012 अंतर्गत 2022-23, 2023-24 व 2024-25 करिता जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी जास्तीत जास्त युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी दि.28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड प्रकाश वाघ यांनी आवाहन केले आहे.

जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप हे एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. हा पुरस्कार हा गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.10000/- (प्रती युवक व युवतींसाठी) तर प्रती संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 50,000/- अशा स्वरुपाचा असेल. अर्जदार युवक युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 01 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराचे वास्तव्य किमान 5 वर्षे जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.

पुरस्काराच्या मुल्यांकनासाठी युवा पुरस्कारासाठी युवा व युवा संस्थांनी केलेले कार्य हे 1 एप्रिल ते 31 मार्च, या कालावधीतील किमान गत 3 वर्षांची केलेली कार्य कामगिरी विचारात घेतली जाईल. यामध्ये समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनताजी आदिवासी भाग इ.बाबतचे कार्य तसेच शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, श्रीभुण, व्यसनमुक्ती तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य याव्यतिरिक्त नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस बाबत कार्य विचारात घेतले जाईल.

या युवा पुरस्करासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल नेहुली संगम, अलिबाग येथून प्राप्त करुन घेऊन दि.28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावेत तसेच अधिक माहीतीसाठी 8369643502/ 7738051502/ 9967277082 (नीळकंठ आखाडे) या क्रमांकावर सपर्क साधावा.

000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान