अलिबाग महोत्सव 2017 अलिबाग हे एकमेकाद्वितीय पर्यटनस्थळ- ना.जयकुमार रावल
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रीत प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्र किनारा असे एकमेवाद्वितीय पर्यटन स्थळ आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करु, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी आज येथे केले. अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग, नगर परिषद अलिबाग व महिला बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित अलिबाग महोत्सव 2017 च्या उद्घाटन प्रसंगी ना.जयकुमार रावल बोलत होते. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचत गट फेडरेशनच्या चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नग...