अल्पसंख्याक हक्क दिवस :कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने पुढे यावे :जिल्हाधिकारी कार्यालयातील चर्चेत आवाहन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- अल्पसंख्याक समाजाच्या हितांचे रक्षण करुन त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी
अल्पसंख्याक विकासाच्या विविध योजना शासन राबवते.या योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक
समाज घटकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चर्चेत करण्यात
आले.
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
अल्पसंख्याक समाज प्रतिनिधींसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेस भूसंपादन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी, रोहयो
उपजिल्हाधिकारी प्रेमलता जैतू, सामान्य शाखेचे तहसिलदार काशिनाथ नाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
एस.एम.आवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश
निकम, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी श्रीकांत
ओसवाल, आकाश ओसवाल, नसीम शेख आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी वेटकोळी यांनी उपस्थितांचे स्वागत
करुन अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले. यादिनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक
कल्याण योजनांची व त्यांच्या अंमलबजावणी यंत्रणांची माहिती संबंधित समाज घटकाला करुन देण्यात येते. यावेळी श्रीमती जैतू यांनी शासनाच्या विविध योजनांची
माहिती दिली. तर शिक्षणाधिकारी आवारी यांनी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या
विविध योजना व शिष्यवृत्त्यांची माहिती दिली. तसेच अल्पसंख्याक समाजाला योजनांचा लाभ
मिळविण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले व
कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली. श्रीमती जैतू यांनी उपस्थितांचे
आभार मानले.
०००००
Comments
Post a Comment