लोकसभा निवडणूक सन 2024 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 257 गुन्हे नोंद, 256 आरोपीना अटक 71 लाख 86 हजार 841 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
रायगड(जिमाका)दि.24:- लोकसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईत रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.16 मार्च ते दि.22 एप्रिल 2024 पर्यत एकूण 257 गुन्हे नोंदविण्यात आले असून 256 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आर.आर.कोले यांनी सांगितले. संपूर्ण कारवाईमध्ये 1 लाख 12 हजार 872 लिटर दारु व 13 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 71 लाख 86 हजार 841 आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 145 गुन्हे नोंद करण्यात येवून 45 लाख 39 हजार 415 रुपये किंमतीचा मुद्देमाल व मावळ मतदारसंघात एकूण 112 गुन्हे नोंद करण्यात आले असून रुपये 26 लाख 47 हजार 426 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 149 खाली एकूण 596 संशयित व सराईत गुन्हेगारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अंतर्गत एकूण 221 प्रस्ताव लोकसभा मतदारसंघातील उप...