32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण



रायगड दि.23(जिमाका):-32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी  मतदान सात मे रोजी होणार असून यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया

जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे , निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.

32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण 3 हजार 47 बॅलेट युनिट, 3 हजार 47 कंट्रोल युनिट व 3 हजार 206 व्हीव्हीपॅट  प्राप्त प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्र निहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम,आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या सह राजकीय पक्षाचे उमेदवार व  प्रतिनिधी, विविध पोलीस व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक