कुटूंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्यांचा गौरव समारंभ संपन्न
अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक रायगड-अलिबाग यांच्या तर्फे व इनजेंडर हेल्थ या संस्थेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट संस्था व सेवा प्रदात यांचा गौरव समांरभ कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई इन रेवस रोड, चोंढी येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.सुचिता गवळी, डॉ.श्रीम.सिंग, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.चंद्रकांत जगताप, शल्य चिकित्सक माणगाव डॉ.कामेरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ माणगाव डॉ.सिध्दी कामेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अडतमोल, जिल्हा विस्तार माध्यम विस्तार अधिकारी जि.प.राजेंद्र भिसे, इनजेंडर हेल्थ या संस्थेचे डॉ.सागर खांडेकर, नम्रता दोषी, कांक्षा सिंग, श्याम गायकवाड आदि उपस्थितीत होते. आरोग्य संस्था व सेवा प्रदाते यांना त्यांच्या चांगल्या कामग...