ग्रा.पं. निवडणूकः मनाई आदेश जारी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2018 चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.22 जानेवारी पासून आचार संहिता अमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पोलीस हद्दीत परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत वडघर ग्रामपंचायत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत सोमटणे,मोरबे, खैरवाडी ग्रामपंचायत. खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आदई,विचुंबे ग्रामपंचायत, उरणे पोलीस ठाणे हद्दीत म्हातवली ग्रामपंचायत, न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत गव्हाण,फुंडे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींची रिक्त पदासाठीची पोट निवडणूक होणार असून मतदान दि.25 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) मनाई आदेश जारी अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मधील एनआरआय पोलीस ठाणे व परिमंडळ-2 पनवेल विभ...