ग्रा.पं. निवडणूकः मनाई आदेश जारी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक
सन 2018 चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.22 जानेवारी पासून
आचार संहिता अमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पोलीस हद्दीत परिमंडळ-2 पनवेल
विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत वडघर
ग्रामपंचायत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत सोमटणे,मोरबे, खैरवाडी ग्रामपंचायत. खांदेश्वर
पोलीस ठाणे हद्दीत आदई,विचुंबे ग्रामपंचायत, उरणे पोलीस ठाणे हद्दीत म्हातवली ग्रामपंचायत,
न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत गव्हाण,फुंडे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींची रिक्त पदासाठीची पोट निवडणूक होणार असून मतदान
दि.25 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी
26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कालावधीत
कायदा सुव्यवस्था अबाधित राहून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांनी
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) मनाई आदेश जारी अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1
मधील एनआरआय पोलीस ठाणे व परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल शहर पनवेल तालुका खांदेश्वर, उरण, न्हावा शेवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात शस्त्र परवानाधारकांना
शस्त्रास्त्रे घेवून फिरण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत. प्रत्येक शस्त्र परवानाधारकास
आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम
144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. हे आदेश दि.27 फेब्रुवारी रोजी रात्रौ 24.00 वाजेपर्यंत
अंमलात राहतील. या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या शस्त्र परवानाधारकांवर भारतीय दंड
संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पोलीस आयुक्त, नवी
मुंबई यांनी दिला आहे.
००००
Comments
Post a Comment